
नागपूर – तिरळे कुणबी समाजाच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी दिनेश हरणे (पाटील) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच चिखलदरा येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. तिरळे कुणबी समाज संघटन महाराष्ट्र राज्य या नोंदणीकृत संघटनेची चिखलदरा येथे बैठक पार पडली. या सभेत राज्यभरातील तिरळे कुणबी समाजाचे पदाधिकारी समाज बांधव व महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संघटनेचा उद्देश व कार्यप्रणाली या संदर्भात यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बडे, उपाध्यक्ष गिरीश काळे,कोषाध्यक्ष विक्रम मानकर, सचिव पराग वानखेडे यांनी यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे दिनेश हरणे पाटील यांना प्रदान केली. यावेळी राज्य जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.