मुंबईत आज मविआच्या आमदारांची बैठक

0
29

मुंबई-राज्यातील राजकीय घडामोडी आणि विधिमंडळ अधिवेशनातील डावपेंचावर आज महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत.
उबाठाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, समाजवादी पार्टीचे अबू आझमी,शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसेच विधानपरिषदेचे सदस्य शिवसेना आमदार अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे उपस्थित असणार आहेत. दोन दिवसात अधिवेशन संपणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीत विरोधकांचे डावपेच ठरणार आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा