नितीन देसाई यांनी का उचलले टोकाचे पाऊल ?,पोलिसांचा तपास सुरु

0
37

 

 

मुंबई- सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक, एन डी स्टुडिओचे मालक नितीन देसाई यांनी आपल्या स्टुडियोमध्येच आत्महत्या केली असून अद्याप आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. नितीन देसाई यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला नक्कीच हादरा बसला आहे. सुमारे 249 कोटींचे थकीत कर्ज हे कारण दिले जात असले तरी नितीन देसाई यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलीस वेगवेगळे पैलू तपासण्याचे कामी लागले आहेत.

एसपी सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी नऊच्या दरम्यान त्यांनी दोरीच्या साह्याने गळफास घेतला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम, सायबर फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट टीम यांना पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांकडून सर्व पैलू तपासून घेतले जात आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा