समता परिषदेने काढली संभाजी भिडे यांची अंत्ययात्रा

0
57

 

(Jalna)जालना : महात्मा फुले यांच्याबाबत संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करत आंदोलन करण्यात आले.समता परिषदेच्या वतीने (Sambhaji Bhide) संभाजी भिडे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. शहरातील (Lahuji Salve Chowk)लहुजी साळवे चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी भिडे यांनी महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला.

आंदोलना दरम्यान समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलना दरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यानंतर पोलिसांनी 2 आंदोलकांवर लाठीचार्ज करत त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान भिडे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आंदोलकांनी केली.आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी नाहक लाठीचार्ज केला असा आरोप समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षांनी केला आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा