मोठ्या प्रकल्पांमध्ये 70 टक्के जलसाठा

0
42

 

गोंदिया – मागील दोन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दर्शविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील धरण जवळपास 70 टक्के भरलेले आहेत. पुढील एक-दोन दिवसात जर पावसाचा जोर कायम असला तर जिल्ह्यात पूर्व परिस्थिती निर्माण होऊ शकते. जिल्ह्यात एक जून ते आज रोजी पर्यंत नैसर्गिक आपत्तीमध्ये एकूण 5 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी दोन व्यक्तींना जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासनाकडून प्रत्येकी 4 लाख रुपये मदत देण्यात आलेली आहे. तसेच 16 लोक जखमी आहेत त्यापैकी 6 लोकांना मदत देण्यात आलेली आहे. तसेच पशुधनाची हानी झालेली आहे, त्यांना पण मदत देण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत एकूण 646 घरगुती गोठे पडलेले आहेत. त्याकरिता नुकसान भरपाई राज्य शासनाकडून ही मागणी करण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी लवकरात लवकर अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. सध्या गोंदिया जिल्हा मध्ये मोठे प्रकल्प आहेत, त्यात 70 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा