Congress काँग्रेसने विधान भवनात साजरा केला आनंद

0
41

 

मुंबई Mumbai : काँग्रेसचे खासदार RAHUL GANDHI  राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस congress आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. राहुल गांधींना गुजरात न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे काँग्रेस आमदारांनी आनंद साजरा केला. आजच Supreme Court सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निकाल दिलाय. या निकालामुळे राहुल गांधी यांची खासदारकी देखील बहाल झाली असल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, आजचा निर्णय ही समाधानाची बाब आहे. क्षुल्लक गोष्टीवरुन सदस्यत्व रद्द करणं हा निर्णय लोकशाहीला मारक होता. परंतु कुठेतरी सत्याचा विजय होतोच ते आज झाले आहे. आता राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल होईल, यात संशय नाही.कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देतांना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशात लोकशाही शिल्लक आहे, हे आज दिसून आलं. चुकीच्या पद्धतीने दिलेल्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे. कोर्टाने केलेलं निरीक्षण आणि घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करते. आता राहुल गांधी लोकसभेमध्ये लढतांना दिसतील, असं सुळे म्हणाल्या.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा