गोन्सालवीस, फरेराची आज सुटका

0
43

मुंबई MUMBAI  एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी व्हर्नन गोन्साल्वीस आणि अरुण फरेरा Vernon Gonsalves and Arun Ferreira  या दोघांची आज नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातून सुटका होणार आहे. सर्वोच्च न्यायालायने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. या प्रकरणात गोन्साल्विस आणि फरेरा हे २०१८ पासून तुरुंगात होते.
ऑक्टोबर २०१८ मध्ये गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना बेकायदेशीर कारवायाचा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा