Vande Bharat वंदेभारत नागपूर टू पुणे, हैद्राबाद, भोपाळ…

0
237

 

नागपूर Nagpur  : भारतीय स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सुरू होणाऱ्या ७५ अत्याधुनिक वंदेभारत  Vande Bharat  एक्स्प्रेसपैकी काही गाड्या नागपूरहून सुरू होताहेत. यातील पहिल्या Nagpur – Bilaspur नागपूर -बिलासपूर एक्स्प्रेसची सुरुवात पंतप्रधानांच्या हस्ते झाल्यानंतर आता नागपूरहून पुणे, हैद्राबाद आणि भोपाळसाठी देखील लवकरच वंदेभारत एक्स्प्रेसचा प्रवास सुरू होणार आहे.
रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक तुषारकांत पांडेय यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार नागपूरहून या तीन वेगवेगळ्या दिशांना वंदेभारत एक्स्प्रेस सोडण्याच्या दॄष्टीने तज्ज्ञांच्या एका चमूने अभ्यासाअंती त्यांचा अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला असून, त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

आजघडीला नागपूरवरून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी प्रवाशांकरिता गाड्या उपलब्ध आहेत. त्यातही मुंबई, पुणे, भोपाळ, हैद्राबाद येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. मात्र मुंबई वगळता उर्वरीत ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशी संख्येच्या तुलनेत गाड्यांची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे या तीनही ठिकाणांसाठी रेल्वे व्यतिरिक्त बस व खाजगी वाहनांनी प्रवास करणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन पुणे, हैद्राबाद व भोपाळसाठी वंदेभारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे विभाग करीत आहे.
राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य Minister Sudhir Mungantiwar मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीच नागपूरहून हैद्राबादसाठी वंदेभारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाला एक पत्र लिहून यापूर्वीच केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसादही मंत्रालयाने दिला होता. त्यानंतर, तज्ज्ञांचा अहवाल सादर झाल्याची माहिती समोर आली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा