30 जुलै 1958 रोजी पॅराग्वेमध्ये आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाने 2011 मध्ये 30 जुलै हा अधिकृत आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केला. पण भारतासह अनेक देश ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. तर भारतासह इतर देशांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 6 ऑगस्ट रोजी (National Friendship Day) साजरा केला जातो. मैत्री दिन हा आपल्या मित्र-मैत्रीणींप्रती प्रेम, आदर आणि भावना व्यक्त करणारा दिवस आहे.
इ.स. 1958 पासून पेरुग्वेमध्ये सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र- मैत्रिणी परस्परांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतात. तसेच, हाताला रंगीत फ्रेंडशिप बॅंड्स बांधतात. फुलं देतात, अनेक गिफ्ट्सही देऊन शुभेच्छा देतात.
मैत्री म्हणजे प्रेम, आपुलकी, आनंद, समाधान आणि बरंच काही. मैत्री हे रक्ताच्या नात्याहूनही अधिक घट्ट असते. मैत्रीचे नात्यात जात, धर्म, वंश, वर्ण अशा प्रकारचे अडथळे कधीही येत नाहीत. भारतात मैत्रीच्या नात्याला एक खास असं स्थान आहे. म्हणूनच मैत्रीच्या नात्यावर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आणि हिट गाणी तयार झालेली आहेत.
मैत्री हे एक सुंदर नातं आहे ज्यात वयाचं, रंगाचं, जातीचं बंधन नसतं. म्हणून आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने तुमच्या खास मित्रांचं कौतुक करा. तुमच्या आयुष्यात त्यांचं किती महत्त्व आहे हे त्यांना सांगा आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवा.
आंतरराष्ट्रीय मैत्री दिन कधी सुरू झाला?
आंतरराष्ट्रीय मैत्री दिन 30 जुलै रोजी साजरा केला जातो. हे पहिल्यांदा 1958 मध्ये वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेडने सुरू केले होते. 2011 मध्ये, हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने औपचारिकपणे आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस म्हणून ओळखला. भारतासह अनेक देशांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
इतिहास काय आहे-
30 जुलै 1958 रोजी जागतिक मैत्री क्रुसेडने प्रथम आंतरराष्ट्रीय मैत्री दिन प्रस्तावित केला होता. ही एक आंतरराष्ट्रीय नागरी संस्था आहे. जरी अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय मैत्री दिन 2011 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. युनायटेड नेशन्सने मैत्री आणि त्याचे महत्त्व दृढ करण्याच्या उद्देशाने या दिवसाचा प्रचार केला
आंतरराष्ट्रीय मैत्री दिन हा शांततेच्या संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी युनेस्कोने घेतलेला एक उपक्रम आहे, ज्यामध्ये जगातील सर्व देशांमध्ये मैत्रीद्वारे आनंद आणि एकतेचा संदेश देण्यासाठी हा दिवस अस्तित्वात आला.
संयुक्त राष्ट्रांच्या मते, आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाचा उद्देश शांतता आणि सामाजिक सौहार्दाला प्रोत्साहन देणे आहे. आपल्या जगात गरिबी, हिंसाचार आणि मानवी हक्क अशा अनेक समस्या आहेत. या समस्या आणि संकटांना तोंड देण्यासाठी एकमेकांच्या सोबतीने राहणे अत्यंत आवश्यक आहे. मैत्री हे याचे साधे उदाहरण आहे.
या दिवशी लोक त्यांच्या मित्रांसोबत हँग आउट करतात, पार्ट्यांमध्ये आणि इतर मार्गांनी एकमेकांसोबत वेळ घालवतात. आपल्या भावना व्यक्त केल्याने मैत्रीचे नाते आणखी घट्ट होते.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी
येथे क्लिक करा