GONDIYA अपघात झालेल्या गाडीतून अवैध दारू जप्त, पोलीसात गुन्हा दाखल

0
38

 

गोंदिया   GONDIYA : मध्यप्रदेशच्या बालाघाट येथून छत्तीसगड Chhattisgarh from Balaghat येथील राजनांदगाव कडे जात असताना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील अंजोरा येथे रात्रीच्या वेळेस रस्त्यावरून चार चाकी चालकाचे नियंत्रण सुटले व गाडी शेत शिवारात शिरल्याने गाडीचा अपघात झाला, याची माहिती आमगाव पोलिसांना मिळताच आमगाव पोलीस घटनास्थळी पोहचली व अपघातात चालक लिंकेश्वर वर्मा 24 वर्ष राहणार डोंगरगड हा गंभीररित्या जखमी झाला असल्याने त्याला बाहेर काढले व गाडीत दारूची दुर्गंध येत असल्यामुळे गाडीची तपासणी केली असता, गाडीमधून दारूच्या 402 काचेच्या बॉटल किमंत 44 हजार 220 रुपये इतकी असून आमगाव पोलिसांनी त्या हस्तगत केल्या आहेत. चालकाला उपचारासाठी आमगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असून दारू व गाडी पोलिसांना जप्त केली असुन आरोपी विरुद्ध आमगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती युवराज हांडे, पोलिश निरीक्षक आमगाव यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा