शेगाव रेल्वेस्थानकाचा होणार संपुर्ण कायापालट -खा प्रतापराव जाधव

0
39

 

बुलढाणा : कोट्यवधी रूपये खर्चून श्री क्षेत्र असलेल्या शेगाव रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जाणार असून काही महिन्यांतच हे रेल्वे स्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्थानक म्हणून उदयास येणार आहे. अमृत महोत्सवी वर्षांच्या निमीत्ताने केंद्र सरकारकडून हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. या नवीन बांधकामाचा आभासी शिलान्यास आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले.  नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
भारतीय रेल्वेने देशातील ५०८ पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांची सुधारणा करण्यासाठी हाती घेतलेल्या अमृत भारत स्थानक सुधारणा योजनेमध्ये राज्यातील ४४ रेल्वे स्थानकांच्या  कामांचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी आभासी पद्धतीने दिल्लीवरून पार पडले. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि मलकापूर रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेत स्थानकावरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी विकास आराखडा तयार करणे आणि त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे. प्रत्येक स्थानकावरील गरज लक्षात घेऊन स्थानकावरील सुविधा सुधारणे, प्रवाशांकरिता मोकळे क्षेत्र, प्रतीक्षा गृह (वेटिंग हॉल), शौचालये, आवश्यकतेनुसार उद्वाहन, सरकते जिने, रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेचा स्तर उंचावणे, मोफत वाय-फाय, स्थानिक उत्पादनांसाठी ‘एक स्थानक एक उत्पादन’च्या विक्रीसाठी दालने, उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, सुखसोयीनी सुसज्ज विश्रामगृह, व्यवसाय बैठकीसाठी नामांकित स्वतंत्र जागा, बागबगीचे व सुशोभीकरण लँडस्केपिंग स्वयंचलित पायऱ्या, तीन लिफ्टस्, बारा मिटरचा नवीन फुट ओव्हर ब्रिज, नवीन प्लॅटफॉर्म, बुकींग ऑफिस, ५ जी वायफाय यासह इतर सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रवासी सुविधा या नवीन उपक्रमात असतील. त्यामुळे शेगाव रेल्वे स्थानकाचे संपूर्ण रूप बदलेल व नावलौकित वाढेल असा विश्वास प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा