Tirupati Balaji मोहाडी ते तिरुपती बालाजी १२५२ कि.मी.च्या पदयात्रेस प्रारंभ

0
43

 

धुळे DHULE : धुळे येथील कै. वालचंद बापूजी ग्रुप ऑफ हॉटेल्स व पै. राजेंद्र वालचंद शिंदे Rajendra Walchand Shinde यांच्यावतीने मोहाडी ते श्री तिरुपती बालाजी या १२५२ कि.मी.च्या पदयात्रेचा आज शुभारंभ करण्यात आला. श्री पिंपळादेवीचे दर्शन घेऊन पै. राजेंद्र शिंदे हे भाविकांसह रवाना झाले या पदयात्रेचे हे ९ वे वर्ष आहे. राजेंद्र शिंदे हे दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम करीत असतात त्याच एक भाग म्हणून सायकलने हजारो किलोमीटर प्रवास करीत विविध देव देवतांचे दर्शन घेत असतात. तसेच पायी तिरुपती बालाजी पर्यंत दरवर्षी पदयात्रा काढत असतात.
गेल्या ८ वर्षापासून ते मोहाडी परिसरातून थेट श्री तिरुपती बालाजी अशी पायी पदयात्रा काढतात असतात. त्यानुसार सकाळी पै. राजेंद्र शिंदे यांच्या राहत्या घरापासून मोहाडी ते श्री तिरुपती बालाजी या पदयात्रेस सुरुवात करण्यात आली. श्री पिंपळादेवीचे दर्शन घेऊन पदयात्रा रवाना झाली. ही पदयात्रा दोन महिन्यांचा पायी प्रवास करून श्री. तिरूपती बालाजी येथे पोहोचेल. आपणही समाजाचे आपण काही देणे लागतो म्हणून भाविकांना तिरुपती बालाजीचे दर्शन व्हावे, या हेतूने पै. राजेंद्र शिंदे हे दरवर्षी भाविकांना सोबत घेऊन जातात. याप्रसंगी ज्येष्ठ नेते शशिकाका रवंदळे, गोपी रवंदळे, आर.व्ही. पाटील, कैलास गर्दे, संपूर्ण शिंदे परिवार तसेच सहकारी व आप्तेष्ट उपस्थित होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा