स्पर्धा परीक्षेचे ते शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळणार

0
45

मुंबई : 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क अद्यापही परत मिळालेले नाही. ते शुल्क आता विद्यार्थ्यांना परत केले जाणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलीय. एकूण 21 कोटी 67 लाख रुपयांचे शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळणार आहे. २०१९ मधील ही भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती.
राज्य सरकारने जिल्हा परिषदांमधील विविध 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च 2019 आणि ऑगस्ट 2021 मध्ये महाभरतीची घोषणा करुन प्रकिया देखील सुरु केली होती. या जाहिरातींना अनुसरून पात्र उमेदवारांनी परीक्षा शुल्कासह अर्ज दाखल केले होते. मात्र, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली आणि ती महाभरती राज्य शासनाने रद्द केली. मात्र, परीक्षा शुल्काच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत जमा झालेले कोट्यवधी रुपये विद्यार्थ्यांना परत करण्यात आले नव्हते. पैसे ऑनलाईन जमा झाल्याने ते परत करण्यात कोणतीच अडचण येणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा