काँग्रेसची आढावा बैठक

0
33

 

अमरावती -अमरावतीत आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. काँग्रेसचे निरीक्षक रणजीत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. अमरावतीच्या स्थानिक काँग्रेस भवनात विधानसभा निहाय आढावा घेण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. महानगरपालिका, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये येत्या निवडणुकीची तयारी करायचे संकेत रणजीत कांबळे यांनी बूथनिहाय यादी तयार करण्याच्या देखील सूचना यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदारांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमरावती लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा आहेत. अमरावती लोकसभा राष्ट्रवादीसाठी राखीव आहे. यावेळी अमरावती लोकसभा काँग्रेसला देण्यात यावी असा सूर एक मतांनी कार्यकर्त्यांनी दिला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा