नाशिक-पुणे महामार्गावर एसटी व ट्रकचा भीषण अपघात, एक जण ठार

0
36

 

नाशिक – पुणे-नाशिक महामार्गावर नाशिक ते पुणे जाणारी लेनवर मल्हारवाडी Malharwadi on the Nashik to Pune lane on the Pune-Nashik highway  शिवारात 19 मैल येथे एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून एकजण जागीच ठार झाला. पंक्चर झालेली बस महामार्गावर उभी असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. त्यावेळी एसटी चालक गाडीखाली जॅक लावत होते. त्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी दुसऱ्या एसटी बसमधून दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ट्रक चालकाला खाजगी ॲम्बुलन्सने सोनवणे हॉस्पिटल आळेफाटा येथे दाखल केले. सदर अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा