Devendra Fadnavis पवार’ भेटीचा काहीही तपशील माझ्याकडे नाही – देवेंद्र फडणवीस

0
37

 

छत्रपती संभाजीनगर -शरद पवार -अजितदादा पवार sharad pawar ajit pawar यांच्या भेटीबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही. भेट झाली, नाही झाली, किती वेळ झाली या संदर्भातली कुठलीही माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी तुमच्या ज्ञानामध्ये काहीही भर टाकू शकत नाही असा सावध पवित्रा उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना घेतला.
फडणवीस म्हणाले याबाबतीत अजून तरी मला काही कळलेलं नाही उद्या जर मला असं कळलं तर नक्की तुम्हाला कळवले जाईल. आता आम्ही समन्वय समिती तयार केली आहे ती समिती ठरवेल कोणाला कोणते महामंडळ द्यायचे आहे. अजून सगळ्या गोष्टी नक्की झाल्या नाहीत. नक्की झाल्यावर कळवू असा बचाव फडणवीस यांनी केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा