
वर्धा, 13 ऑगस्ट : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 18 ऑगस्ट रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यास नोकरी इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी 11 वाजता आयोजित मेळाव्यात मारुती सुझुकी गुजरात या कंपनीकडे रिक्त असलेली पदे भरण्यासाठी कंपनी प्रतिनिधी उपस्थित राहून पात्र उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया पार पाडणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे मुळ शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र व एम्प्लॅायमेंट कार्ड घेऊन वेळेवर मेळाव्यात उपस्थित राहावे, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त निता औघड यांनी कळविले आहे.
