“भीष्म पितामहांकडून हे अपेक्षित नाही”, राऊतांची पवारांवर थेट टीका

0
124

मुंबई-शरद पवार आणि अजित पवार Sharad Pawar and Ajit Pawar यांच्यातील गुप्त भेटीचे संतप्त पडसाद महाविकास आघाडीत उमटत असून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर थेट टीका केली (MP Sanjay Raut on Sharad Pawar) आहे. “राजकारणातल्या भिष्म पितामहाकडून हे अपेक्षीत नाही”, असा शब्दात त्यांनी शरद पवार यांना प्रथमच सुनावले आहे. तर दुसरीकडे राऊतांनी आमदार रोहित पवार यांच्याही वक्तव्याचा समाचार घेतला. “तुम्हाला नातेसंबंध जपायचे असतील, तर कार्यकर्त्यांनी का लढायचे?” असा सवाल त्यांनी उपस्थित रोहित पवारांना केला.

शरद पवारांच्या भूमिकेवर प्रथमच महाविकास आघाडीकडून आणि विशेषतः ठाकरे गटाकडून कठोर टीका झाली आहे. शरद पवार यांच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रम निर्माण होत आहे. अशा प्रकारचा शिवसेनेचा डीएनए नाही. शिवसेनेचा डीएनएने मध्ये कोणतेही दोन नाहीत, असेही ते म्हणाले.

अजित पवारांशी झालेल्या भेटीवर स्पष्टीकरण देताना शरद पवार म्हणाले की “अजित पवार माझे पुतणे आहेत व त्यांनी भेट घ्यायला काय हरकत आहे.” तर दुसरीकडे रोहित पवार यांनीही नातीगोती सांभाळावी लागतात, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत संतप्त भावना व्यक्त होत आहे.

संजय राऊत म्हणाले, ही लढाई देशाची आणि राज्याची आहे. त्यात महाभारताप्रमाणे स्वकीय, मित्र, नातीगोती यांची पर्वा आम्हाला करता येत नाही. महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाचं अस्तित्व टिकवण्याची ही लढाई आहे. लोकांमध्ये संशय आणि संभ्रम येईल अशी भूमिका किमान भीष्म पितामहांकडून तरी अपेक्षित नाही. आमची भूमिका त्या बाबतीत स्पष्ट आहे. नातीगोती, प्रेम घरात. या राज्यासमोर आव्हान उभे करण्यात आले आहे. चुकीच्या लोकांबरोबर हातमिळवणी करून जर कुणी आम्हाला आव्हान देत असेल, तर ते आमचे नातेवाईक नाहीत, अशा थेट शब्दांत राऊतांनी शरद पवारांना सुनावले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा