
कोल्हापूर, 16 ऑगस्ट : MAHARASHTRA महाराष्ट्रातील Kolhapur कोल्हापूर जिल्ह्यात आज, बुधवारी सकाळी 6.45 वाजता 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. National Center for Seismology नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
या दरम्यान सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह लगतच्या गावांमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. येथे पहाटे 6.40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला आहे. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये या भूकंपामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंप धक्के जाणवले असून धरण सुरक्षित असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
