अखेर नेहरू स्मारकाचे नाव बदलले

0
88

(New Dellhi )नवी दिल्ली-दिल्लीतील नेहरू स्मारकाचे नाव बदलून आता पंतप्रधान म्युझियम अँड लायब्ररी (PMML) म्हटले जाणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्यदिनी नाव बदलण्याची औपचारिकता पार पाडण्यात आली. दरम्यान, विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.

जून महिन्यातच नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी सोसायटीच्या विशेष बैठकीत त्याचे नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी असे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे. (PML Vice President A Surya Prakash) पीएमएलचे उपाध्यक्ष ए सूर्य प्रकाश यांनी नाव बदलण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्रातील मोदी सरकार सुडाने वागत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे तर ठाकरे गटाचे खासदार (Sanjay Raut)संजय राऊत यांनीही या निर्णयावर टीका केली आहे.

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा