देशातील चित्र मोदींना अनुकूल नाही

0
81

– (SHARAD PAWAR)शरद पवार

(Aurangabad)औरंगाबाद : देशाचे चित्र मोदी सरकारला अनुकूल दिसत नाही, त्यामुळे मी पुन्हा येईल, असे कितीही सांगितले तरी त्यांची अवस्था देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी होईल, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. (Sharad Pawar on PM Modi) पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी टीका केली.

मणिपूरजवळ चीन आहे, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगून पवार म्हणाले की, पंतप्रधानांना मणिपूरमध्ये जाऊन लोकांना विश्वास द्यावासा वाटला नाही. जनमत मोदी सरकार विरोधात करायची इंडियाची भूमिका आहे. आम्ही संघर्ष करू आणि मजबुतीने उभे राहू. जनमत तयार करून यांना धडा शिकवू, असे पवार म्हणाले.

पवार म्हणाले, मोदी सरकार विरोधात जनमत दाखवणे आणि पर्याय देणे यासाठी हा लढा आहे. आपल्यासोबतचे काही सहकारी भाजपसोबत सत्तेत गेले. त्या आधी कोणताही राजकीय निर्णय हे राजकीय नेते घ्यायचे, पण आता राजकीय निर्णय ईडी ही संस्था घेते, असे आपल्या सहकाऱ्यांनी मला भेटल्यानंतर सांगितले. ईडी ठरवते कोणत्या पक्षात कोण जायचे ते, अशी टीकाही त्यांनी केली.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा