“सन्मानजनक जागा मिळाल्या तर महायुतीत, नाहीतर..” : आमदार बच्चू कडू

0
30

अमरावती- प्रहार संघटेनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुतीत आम्हाला सन्मानजनक जागा न मिळाल्यास आम्ही स्वतंत्रपणे लढू असा इशारा आमदार कडू यांनी दिला (Prahar MLA Bachchu Kadu) आहे. प्रहारने १५ मतदारसंघात मिशन विधानसभा सुरु केले असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीसाठी आम्हीही मजबूतपणे तयारी करत आहोत. यासाठी पक्षाची बांधणी सुरू झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशात आमचा मजबूत जनाधार आहे. त्यामुळे शक्य झाले तर महायुतीत नाही तर स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे, असे ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच अमरावतीमध्ये शेतमजुरांच्या समस्यांवरून आमदार कडू यांनी मोर्चा काढून सरकारवर टीका केली होती. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर कडू यांची नाराजी वाढली असून अपक्षांना महत्व दिले जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. आता सर्वच पक्षांना लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशाराच दिला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा