
बीड BEED : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या (NCP President Sharad Pawar Rally in Beed) बीडमधील जाहीरसभेला मोठी गर्दी जमली होती. या गर्दीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना गर्दी पैसे वाटून गोळा केल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यावरुन आता टिकाटिप्पणी सुरु झाली आहे. NCP
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवारांनी बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन जाहीरसभा सुरु केल्या आहेत. १७ ऑगस्ट रोजी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात जाहीरसभात घेतली. या जाहीरसभेत मोठी गर्दी जमल्याचे बघायला मिळाले. मात्र, आता या जाहीरसभेसाठी पैसे देऊन गर्दी जमविल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही महिला पैशांचे वाटप करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो पवारांच्या जाहीरसभेतील असल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडल्यानंतर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्वच आमदार हे अजित पवार गटात सामील झाले. मात्र, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. क्षीरसागर यांनी स्वाभिमान सभेचे आयोजन केले होते.
