बावनकुळेंना कोर्टात जायचंय खुशाल जा, मी वकील देतो – संजय राऊत

0
31

 

मुंबई – बावनकुळे यांना म्हणावं की, खुशाल कोर्टात जा, मी वकिल देतो, त्यांचं वाचन कमी आहे, माझा त्यांना सल्ला आहे की, वाचाल तर वाचाल. त्यात जर उपमुख्यमंत्र्यांना उप म्हटले तर गैर काय? असा सवाल शिवसेना नेते ख संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राऊत म्हणाले,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसे जपानला गेले तसे त्यांनी चीन ला जावं, लडाखला जावं, तिथली परिस्थीती समजून घ्यावी, हे फडणवीस यांचं डिमोशन आहे.अजीत पवार हे परखड मत मांडणारे नेते आहेत, त्यांना आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. कळव्यातील घटना दुर्दैवी असून अजीत पवारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. राहुल गांधींना पहा, आम्ही काही महिन्यांपूर्वी लडाखला गेलो. राहुल गांधींनी लेह ते लडाखपर्यंत बाईक चालवल्याचेही मी पाहिले आहे. चीन लडाखमध्ये घुसला, किती गावं, किती जमिनींवर कब्जा केला? हा मुद्दा वारंवार समोर आला आहे. अरुणाचलच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारानेही सांगितलं आहे की, चीनने कब्जा केला आहे. चांद्रयान जे मोदींनी पाठवल आहे, त्यातूनही पाहा की चीनने किती कब्जा केला आहे. चीनने लडाखवरही ताबा मिळवला आहे. त्याचे पुरावेही समोर आले आहेत. पण आपले संरक्षणमंत्री आपल्या पंतप्रधानांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नसतील, तर आपण न्याय करत नसल्याचे दिसते.आम्ही अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला त्यांनी यावर चर्चा टाळली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा