भाजयुमोचे आंदोलन, भाजपचा उद्धव ठाकरेंना इशारा

0
35

 

नागपूर  NAGPUR -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या विरोधात सामना वृत्तपत्रात आलेल्या वृत्त, अग्रलेखावरून आज राज्यभरात ठाकरेंची शिवसेना विरोधात भाजप रस्त्यावर उतरली. नागपुरातील महाल टिळक पुतळा परिसरात सायंकाळी भारतीय जनता युवा मोर्चाने वृत्तपत्र प्रति जाळून संताप व्यक्त केला. आमच्या नेत्यांनी राज्याची, देशाची प्रतिमा उंचावलेली असताना त्यांना केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी लक्ष्य करण्याचा प्रयत्न न थांबविल्यास उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत Uddhav Thackeray, Aditya Thackeray and Sanjay Raut यांच्या शिल्लक सेनेला नागपुरात पाय ठेऊ देणार नाही असा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिला. देवेंद्र फडणवीस उप झाल्याने वैफल्यग्रस्त झाल्याची वायफळ टीका ठाकरे गटाचे मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे. या विरोधात आज भाजयुमो तर्फे हे निषेध आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने भाजयुमो, भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा