हाजरा फॉल धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी

0
69

 

गोंदिया GONDIYA – सध्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील हाजरा फॉल Hazra Falls हा पर्यटकांचे लक्ष वेधणारा व आकर्षणाचे केंद्र बनलेला आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विशेषत: शेजारच्या  CHTISGAD छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यातील मोठ्या संख्येने पर्यटक धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. धबधबा बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांना धबधब्यासमोर सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही. आदिवासी बहूल Naxalite नक्षलग्रस्त संवेदनशील तालुका म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे. त्यातच सालेकसा- डोंगरगड या महामार्गावर छत्तीसगड राज्याच्या सिमेवरच आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेले कचारगढ देवस्थान असून त्या आधीच घाट परिसरात हिरव्या वनराईने नटलेला ब्रिटीश कालीन हाजरा फॉल धबधबा आहे. जवळपास तीस- चाळीस फुटावरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करीत आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, मन प्रफुल्लित करणारा वारा वाहत असतो. विशेष म्हणजे पावसाळी पर्यटनासाठी हे स्थळ जिल्ह्यासह शेजारच्या राज्यात प्रसिध्द असल्याने भर पावसाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी असते.

प्रत्येक पावसाळ्यात हा धबधबा ओसंडून वाहत असतो. जसजसा मोठा पाऊस पडतो तसतसा हा धबधबा आकर्षक रौद्र रूप धारण करून पर्यटकांना मनमोहित करतो. गेल्या तीन दिवसापासून पाऊस येत असल्याने धबधब्याची धार सध्या जोरात असताना हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देऊन निसर्गाचा आनंद लूटत आहेत. त्यामुळे, हाजरा फॉल मध्ये सध्या पर्यटकांची गर्दी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्हाधिकारी आणि वन विभागाच्या मदतीने येथील वन व्यवस्थापन समिती या सर्व धबधब्याची देखरेख करीत असून या समिती द्वारा या ठिकाणी जीप लाईन, गार्डन, मुलांना खेळण्यासाठी सहासी खेळ, ट्रेकिंग अशा विविध मनोरंजनाच्या साधनांसोबत लहान मुलांच्या खेळण्याचे साधन सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. या धबधब्याच्या देखरेखीसाठी नवा टोला या गावातील जवळपास 30 ते 40 आदिवासी युवक, युवतींना रोजगाराची संधी मिळाली आहे. त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना आल्यावर खण्याची सोय या ठिकाणी आदिवासी, युवक युवतींद्वारा करण्यात येते. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा