कांद्याच्या मुद्यावर बच्चू कडूंची केंद्रावर टीका

0
29

पुणे PUNE  -प्रहारचे आमदार Bachchu Kadu बच्चू कडू यांनी कांद्याच्या मुद्यावर केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार केवळ सत्ता टिकवण्याचा विचार करीत असून सरकार नामर्दासारखे वागत असल्याची टीका त्यांनी केली. (MLA Bachchu Kadu on Onion Prices) सत्तेसाठी सरकार केवळ ग्राहकांचा म्हणजे कांदा खाणाऱ्याचाच विचार करीत असून पिकविणाऱ्यांचा म्हणजे शेतकऱ्यांना विचार का केला जात नाही, असा सवाल त्यांनी केला.

कांद्यावर लादण्यात आलेले ४० टक्के निर्यातशुल्क आणि किरकोळ बाजारपेठेत कांद्याच्या वाढलेल्या दरावरुन सध्या राज्यात प्रचंड गदारोळ सुरु आहे. त्यावर बोलताना कडू म्हणाले, सरकारने ही नालायक वृत्ती सोडली पाहिजे. ज्या लोकांना कांदा परवडत नसेल त्यांनी लसुण किंवा मुळा खाण्यात काही गैर नाही. केंद्र सरकार कांद्याचे दर वाढल्यावर हस्तक्षेप करते. मग भाव कमी झाल्यानंतर सरकार हस्तक्षेप का करत नाही?, असेही कडू म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा