चंद्रावर ‘लँडींग’ची अडचण आल्यास ‘बी प्लान’ही तयार

0
45

 

नवी दिल्ली  NEW DELHI : चंद्राजवळ पोहोचलेले चांद्रयान-३ बुधवारी सायंकाळी चंद्रावर उतरणार आहे. यानचे लँडींग सुरळीत राहील, असा विश्वास istro इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. तथापि, यावेळी काही समस्या उद्भवल्यास इस्त्रोने पर्यायी प्लान बी देखील तयार ठेवला असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Chandrayaan-3 Moon Landing)
सर्व जगाचे लक्ष या मोहिमेकडे लागून आहे. या मोहिमेत भारत यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा तो पहिला देश ठरणार आहे. उद्या बुधवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास हे यान चंद्रावर उतरविण्याचे नियोजन आहे. मात्र, यावेळी काही समस्या निर्माण झाल्यास इस्रोने पर्यायी प्लान बी तयार ठेवला असल्याचे ISRO Chief S. Somnath इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे. लँडिंगमध्ये काही अडचण आल्यास इस्रोही वेळही बदलू शकते व ही प्रक्रिया २७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते. २३ ऑगस्ट रोजी चंद्रयान-३ चंद्रावर उतरण्याच्या दोन तास आधी लँडर मॉड्यूलची स्थिती आणि चंद्रावरील परिस्थिती लक्षात घेऊन यान चंद्रावर उतरणे योग्य आहे की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. परिस्थिती अनुकूल नसेल तर आम्ही २७ ऑगस्ट रोजी यान चंद्रावर उतरविण्याची योजनाही तयार आहे. कोणतीही अडचण यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, असे वैज्ञानिकांनी सांगितले.

सध्यातरी यानाच्या सर्व यंत्रणा योग्य रितीने काम करीत आहेत आणि बुधवारी कोणतीही समस्या येण्याची शक्यता कमी आहे, असा विश्वास देखील इस्त्रोकडून व्यक्त करण्यात आला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा