जुन्या वादातून तरुणाची हत्या; पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

0
40

 

भंडारा- भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपुर येथे अभिषेक कटकवार या तरुणाची जुन्या वादातून धारदार शस्त्र व दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. आठ दिवसापूर्वी मृतकाचे काही तरुणांसोबत सामान्य रुग्णालय परीसरात भांडण झाले होते. याच भांडणातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. अभिषेक कटकवार वय वर्ष 25 रा. टप्पा मोहल्ला असे मृतकाचे नाव आहे. आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र, भंडारा पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत पाचही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी आरोपी विरुद्ध खुनाचा गून्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून भंडारा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा