
लखनौ-२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशपातळीवर एनडीए आणि इंडिया या दोन आघाड्या तयार झाल्या असताना या दोन्ही आघाड्यांचे लक्ष उद्या होणाऱ्या बसपाच्या महत्वाच्या बैठकीकडे लागले आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत बसपाप्रमुख मायावती नेमका काय निर्णय घेतला, याची उत्सूकता राजकीय वर्तुळात आहे.
मायावतींनी उद्या पक्षाची बैठक बोलावली आहे. सध्या बसपा दोन्हीपैकी एकाही आघाडीत नाही. अनेकदा बसपाने एनडीएच्या बाजुने साथ दिली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा स्वतंत्रपणे लढायचे हे ठरवले जाणार आहे. त्याचबरोबर जागावाटप, पक्षाचा जाहीरनामा आणि निवडणूक रणनीती याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.