पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा

0
25

 

गोंदिया – गेल्या पंधरा दिवसात गोंदिया जिल्ह्यात पाऊस पडला नसल्यामुळे अनेक शेतांमध्ये भेगा पडण्यास सुरुवात झाली होती. मात्र, गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील भात पिक हिरवेगार झाले असून शेतकऱ्यांनी आता आपल्या शेतामध्ये कचरा काढण्याचे काम सुरू केले असून या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येणाऱ्या दिवसात सुद्धा अशाच प्रकारे कष्टकरी शेतकऱ्यांच्या मदतीला पावसाने साथ द्यावी, अशी शेतकरी आशा व्यक्त करत आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा