उद्धव ठाकरेंनी चिंता करू नये, जनता आमच्या सोबत आहे -आ रवी राणा

0
37

 

अमरावती- उद्धव ठाकरे Uddhav Thackeray  यांची अमरावती लोकसभा निवडणूक Amravati Lok Sabha Election संदर्भात मातोश्रीवर बैठक सुरू आहे. यावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिलं, उद्धव ठाकरे कोणत्या जिल्हातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत, हे त्यांनी जाहीर करावं. त्या ठिकाणी नवनीत राणा त्यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढणार अशी घोषणा रवी राणा यांनी केली. दुसरीकडे अमरावती जिल्ह्याची उद्धव ठाकरेंनी चिंता करू नये, नवनीत राणा ह्या पूर्णवेळ जनतेत असतात. अमरावतीची जनता नवनीत राणांसोबत आहे, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा