रेल्वेचा बांधकामाधीन पूल कोसळून १७ ठार

0
37

आयझोल-बांधकाम सुरु असलेला रेल्वेपूल कोसळून १७कामगारांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटनामि झोराममध्ये बुधवारी घडली. (Mizoram Rail Bridge collapse) मिझोरमची राजधानी आयझोल पासून २१ किमी अंतरावर असलेल्या सायरंगमध्ये सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून घटनास्थळी बचाव पथके रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.

ही घटना घडली त्यावेळी पुलावर ३० ते ३५ मजुर कामावर होते. बैराबी ते सायरंग या शहरांना जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल उभारला जात होता. तिसऱ्या आणि चौथ्या खांबामधील साडेतीनशे फुटाचा गर्डर पडल्याने हा अपघात झाला.पुलामध्ये एकूण ४ खांब आहेत. या गर्डरवर हे सर्व मजूर काम करत होते. जमिनीपासून पुलाची उंची 104 मीटर म्हणजेच 341 फूट आहे. त्यामुळे गर्डरसोबत मजुरही उंचीवरून खाली पडले. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा