
नवी दिल्ली-चांद्रयान-३ मोहिम फत्ते होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन वैज्ञानिकांचे आणि देशवासीयांचे अभिनंदन केले. हा क्षण भारताच्या ताकदीचा आहे. हा भारतातील नव्या ऊर्जेचा, नव्या विश्वासाचा, नव्या चेतनेचा क्षण आहे. अमृत काळात अमृताचा वर्षाव झाला. आपण पृथ्वीवर एक प्रतिज्ञा घेतली आणि ती चंद्रावर साकार केली. अंतराळात नव्या भारताच्या नव्या उड्डाणाचे आपण साक्षीदार आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान पुढे म्हणाले, जेव्हा आपण आपल्या डोळ्यांदेखल असा इतिहास घडताना पाहतो तेव्हा जीवन धन्य होते. अशी ऐतिहासिक घटना राष्ट्रजीवनाची चिरंजीव चेतना होऊन जाते. हा क्षण अविस्मरणीय आहे. हे क्षण अभूतपूर्व आहेत. हे क्षण विकसित भारताचा शंखनादच आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. हा क्षण १४० कोटी लोकांच्या सामर्थ्याचा आहे, असे मोदी म्हणाले. मोदी म्हणाले, मी या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण अफ्रिकेत आहे. प्रत्येक घरात उत्सव सुरू झाला. मी हृदयपूर्वक आपल्या देशवासियांसह आणि कुटुंबासह उल्हास आणि आनंदाने सहभागी झालो आहे,

असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आजपासून चंद्राशी संबंधित मिथकं बदलणार आहेत. कथानकही बदलतील. नव्या पिढीसाठी म्हणीही बदलणार आहेत. भारतात आपण सर्वजण पृथ्वीला आई आणि चंद्राला मामा म्हणतो. पूर्वी म्हटले जायचे की “चंदा मामा दूरके…पण, आता मुलं म्हणतील चंदामामा बस एक टुरके..”