
नागपूर -गेल्या अनेक वर्षापासून रुग्णसेवेच्या दृष्टीने मोलाची कामगिरी बजावणाऱ्या, आयुर्वेद चिकित्सामध्ये कार्यरत असलेल्या शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सीमार्फत आपल्या हाडांची अगदी मोफत घनता तपासणी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. धकाधकीच्या जीवनात बहुतांशी लोकांचे आपल्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, हाडांची होणारी झीज या संदर्भात शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी, योग कॉम्प्लेक्स महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार सीताबर्डी येथे बोन मिनरल डेन्सिटी अर्थात आपल्या हाडांची खनिज घनता तपासणी अगदी मोफत करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. डॉ विनोद तिवारी डॉक्टर,डॉ अतुल एस. तेलरांधे हे गुरुवारी 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 6 दरम्यान ही तपासणी करणार आहेत. मान दुखी, पाठदुखी,गठिया स्वरूपातील दुखण्यांपासून आपण त्रस्त असाल तर आपल्या हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता असू शकते, याकडे दुर्लक्ष न करता आपल्या हाडांची खनिज घनता तपासणी करणे आवश्यक असल्याचे डॉ विनोद तिवारी यांनी सांगितले. नोंदणीसाठी शंभर रुपये शुल्क असून गेल्या चार दशकांपासून मासपेशी, गठिया संदर्भातील दुखण्यांवर रामबाण उपाय असलेले झंडू रूमासील आणि रुमा योगद्वारा संचालित या शिबिरासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यावेळी प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉक्टर विनोद तिवारी, डॉक्टर आकांक्षा राधेश्याम गुप्ता, डॉक्टर पारुल मोहित गुप्ता, डॉक्टर रचना मयूर गुप्ता आणि डॉक्टर अतुल एस तेलरांधे ही तज्ञ डॉक्टरांची चमू, पॅनेल यावेळी रुग्णांची तपासणी करणार आहे.