रमण विज्ञान केंद्रासमोर आपचा जल्लोष, पावसाचीही जोरदार हजेरी

0
35

नागपूर : भारताचे चंद्रयान -3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आज नागपुरातील रमण सायन्स सेंटरमध्ये खगोलप्रेमी, विद्यार्थी, शिक्षकांनी गर्दी केली. गांधीसागर स्थित रमण विज्ञान केंद्र येथे विद्यार्थी खगोल प्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली. नागपूरकरांच्या सोबत जोरदार पावसाने हजेरी लावत एकप्रकारे हा आनंदोत्सव साजरा केला. जय हिंद, वंदे मातरम…च्या जयघोषात आम आदमी पार्टीच्या वतीने चंद्रयान चंद्रावर उतरल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत गांधीसागर परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला. दुसरीकडे अजनी चौकात इव्हान या संघटनेतर्फे भारतासाठी या गौरवशाली दिवसाचे महत्त्व लक्षात घेता आनंद साजरा करण्यात आला.मोठ्या संख्येने नागरिक हाती तिरंगा घेत या ठिकाणी जमा झाले होते. विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये आज थेट प्रक्षेपण,विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा