विरोधकांना बोलण्याचे नाक नाही- खासदार अनिल बोंडे

0
26

 

अमरावती – कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के कर सरकारने लावला. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे.

निषेध केला जात आहे. भाजपचे
खासदार अनिल बोंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
कराचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सरकारने नाफेडकडून 2 लाख टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचा संकल्प केला. या कांद्याला 2410 रुपयांचा भाव जाहीर केला. शेतकऱ्यांचं कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार असून व्यापाऱ्यांकडून साठेबाजांवर होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. मुळात विरोधकांना बोलण्याचं नाक राहील नाही त्यामुळे ते आंदोलन करत आहेत. शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी अनियंत्रित काळाकरिता निर्यात बंदी केली होती. सरकारने आता निर्यात बंदी केली नाही केवळ कर लावला आहे. हा कर केवळ साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी लावला आहे. शरद पवारांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांसाठी कोणतेही काम केले नाही. आता केवळ व्यापाऱ्यांकरिता गळे काढण्याचे काम करत आहेत, असा आरोप देखील बोंडे यांनी केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा