फोन टॅपिंग प्रकरण अखेर बंद, रश्मी शुक्लांना दिलासा

0
26

मुंबई : MAHARASHTRA  महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला आहे. सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला आहे. (Rashmi Shukla Phone Tapping case) त्यामुळे या प्रकरणात आरोप असलेल्या गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांना मोठाच दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणात गुन्हे देखील दाखल झाले होते. मात्र, सीबीआयच्या CBI  तपासात काय निष्पन्न झाले, हे अद्याप तरी स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मुख्यमंत्री एकनाथ सिंदे यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. नंतर, सीबीआयने प्रकरणाचा तपास बंद करण्याबाबतचा अहवाल महानगरदंडाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. राज्य गुप्तचर विभागानेही या प्रकरणाचा तपास बंद करण्यास आक्षेप नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर महानगरदंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी सीबीआयचा अहवाल मान्य करून प्रकरणाला पूर्णविराम दिला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा