भारत राष्ट्र समितीची 41 हजार सदस्य नोंदणी

0
30

 

वर्धा- शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी हितावह तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात लागू करण्याचा मानस असून पक्षाची 41 हजार सदस्य नोंदणी झाली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये 25000 सदस्य ऑनलाईन करण्याचा मानस असून प्रत्येक गावात दहा कमेटी गठीत करणार असून त्यानंतर तालुका कार्यकारणी व जिल्हा कार्यकारणी गठीत करणार असून प्रत्येक निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा मानस आहे. मोठ्या प्रमाणात भारत राष्ट्र समितीला महाराष्ट्रातील जनतेचा प्रतिसाद मिळत आतापर्यंत 41 हजार सदस्य नोंदणी वर्धा जिल्ह्यात झाली आहे. शेतकऱ्याला केंद्रबिंदू समजून तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात यावा यासाठी वेगवेगळ्या पक्षातील अनेक लोक भारत राष्ट्र समिती सामील होत असल्याची माहिती भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भ समन्वयक माजी आमदार चरणसिंग वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भारत राष्ट्र समितीचे जिल्ह्यातील पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा