आम्ही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही, आमचा तो स्वभाव नाही – चंद्रशेखर बावनकुळे

0
25

 

यवतमाळ – घर चलो अभियान सुरू आहे. साडेतीन लाख परिवारांना भेटणार आहोत. ज्यांना भेटतोय ते म्हणत आहेत, मोदी हेच 2024 ला पंतप्रधान पाहिजेत, ही जनतेची भावना आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही, आमचा तो स्वभाव नाही, संस्कार नाही, ज्यांचे संस्कार आहेत ते देशाला माहिती आहे. महाराष्ट्राला माहिती आहे. पक्ष फोडण्याचेच त्यांनी जीवनभर राजकारण केले. आज ते आमच्यावर बोलत आहेत असे टीकास्त्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोडले.
इतिहास पहा काय काय झाले महाराष्ट्रात. पक्ष फोडून कोणी सत्ता मिळवली, उलट एकनाथ शिंदे मर्द मराठा नेता यांनी हिंदुत्वाची साथ धरली, इकडे अजित पवार यांनी देशाचे कल्याण, आत्मनिर्भर भारतासाठी मोदींना साथ दिली आहे. मला विश्वास आहे, पुढच्या काळात शरद पवार आपल मन परिवर्तन करतील आणि मोदींना समर्थन देतील.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चुकीचा निर्णय देऊ शकत नाहीत. त्यांना कायद्याचे ज्ञान आहे. त्यांना त्यांचा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. जेव्हा निवडणूक होतील तेव्हा निकाल येतील तेव्हा बघू.
असा टोला आ बच्चू कडू यांना दिला. कांदा लिलाव प्रकरणी पियुष गोयल, देवेंद्र फडणवीस, भारती पवार लक्ष ठेवून आहेत. मला वाटते कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. मराठवाड्यात बैठक होत आहे, अत्यंत आनंद आहे. त्याभागतील प्रश्न सुटतील, मार्गी लागतील. विदर्भात अधिवेशन त्यामुळे विदर्भाचे सुद्धा प्रश्न सुटतील.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा