सना खान हत्याकांड, आमदार शर्मा म्हणाले माझा संबंधच नाही !

0
31

 

नागपूर :भाजप नेत्या सना खान यांच्या हत्या प्रकरणी आमदार संजय शर्मा यांना हजर होण्याची नोटीस पोलिसांनी पाठविली होती. आमदार संजय शर्मा आज चौकशीसाठी आपल्या समर्थकांसह नागपुरात दाखल झाले. संजय शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले. सीताबर्डी येथील झोन 2 डीसीपी कार्यालयात यानंतर ते हजर झाले. सना खानच्या हत्याप्रकरणी आपली कुठलीही भूमिका नाही आणि मुख्य आरोपी अमित शाहू याच्याशी आपली गेल्या अनेक वर्षात भेट नाही, तो आधी आमच्याकडे कामाला होता, सना खानला मी ओळखत नाही असेही शर्मा यांनी स्पष्ट केले. आरोपीसमोरही आ शर्मा यांच्याशी विचारपूस झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, 24 दिवस उलटूनही आपल्या मुलीचा मृतदेह सापडत नाही, हनी ट्रपच्या नावावर दिशाभूल केली जात आहे असा आरोप या ठिकाणी आलेल्या सना खान यांच्या आई मेहरूंनीसा खान यांनी माध्यमांशी बोलताना केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा