भाजपचे पहिले पंतप्रधान नरसिंहराव होते : मणिशंकर अय्यर

0
34

 

नवी दिल्ली: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे भाजपचे पहिले पंतप्रधान होते, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर (Mani Shankar Aiyar) यांनी केली.अय्यर यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राव यांचा जातीयवादी विचारांकडे कल होता, असेही ते म्हणाले. अय्यर यांच्या ‘मेमरीज ऑफ ए मॅव्हरिक… द फर्स्ट फिफ्टी इयर्स या आत्मचरित्रपर पुस्तकाचे अनावरण झाले. यावेळी मणिशंकर अय्यर यांनी विविध मुद्यांवर थेट भाष्य केले. बाबरी मशीद प्रकरण हाताळताना राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, अय्यर यांनी शिलान्यास करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे माझे मत होते, असे सांगितले.
पीव्ही नरसिंह राव यांचा कल जातीयवादी विचारांकडे होता, यावरही अय्यर यांनी भाष्य केले. राम-रहीम यात्रेच्या वेळी नरसिंह राव यांनी मला सांगितले की, त्यांचा माझ्या यात्रेवर कोणताही आक्षेप नाही, परंतु ते माझ्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येशी असहमत आहे. मी सांगितले की माझ्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत काय चूक आहे, असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, हा देश हिंदूंचा आहे. भाजपचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नव्हते, तर राव हे भाजपचे पहिले पंतप्रधान होते, अशी टीकाही अय्यर यांनी केली.
पी. व्ही. नरसिंह राव यांनी 1991 मध्ये काँग्रेस सरकारचे नेतृत्व केले. 1991 ते 1996 पर्यंत त्यांनी भारताचे नववे पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांच्याच कार्यकाळात बाबरी मशीद पाडण्यात आली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा