वन कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच

0
26

 

अमरावती- वनविभाग कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध 16 मागण्या घेऊन कास्टाईब वनविभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर भारतीय राज्यघटनेतील संविधानिक मार्गाने व लोकशाही की पेशवाई या बॅनरखाली गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरूचं आहे. संघटने ने या आधी दिलेल्या निवेदनावरून त्वरित मागण्या मान्य करण्यात याव्या, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ नागपूर यांच्या आदेशाचे त्वरित पालन करण्यात यावे, सादर केलेल्या विनंती बदली प्रस्ताव प्रस्तावास मान्यता प्रदान करण्याआधी प्रथमदर्शनी प्रशासकीय दृष्ट्या अन्यायकारक बदलीने पदस्थापना केल्यामुळे न्यायालयात जाण्याकरिता परावृत्त केलेल्या अन्यायग्रस्त वन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसह अन्य 16 मागण्या घेऊन संघटनेचे जितेंद्र मालोदे, नितीन काळे, ज्ञानेश्वर सावळे बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा