भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्वच रद्द, जागतिक संघटनेचा निर्णय

0
27

नवी दिल्ली : माजी अध्यक्षांवरील गंभीर आरोपांमध्ये बदनाम झालेल्या भारतीय कुस्ती महासंघाला आणखी एक नामुष्की सहन करावी लागली (Wrestling Federation of India) असून कुस्तीची जागतिक संघटना असलेल्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने महासंघाचे सदस्यत्व रद्द केले आहे. निवडणुका वेळेत न घेण्यात आल्याने ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाला ताकीद दिली होती.
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने ३० मे रोजी भारतीय कुस्ती महासंघाला पुढच्या ४५ दिवसांमध्ये निवडणुका घेण्यासंदर्भात पत्र लिहिले होते. निवडणुका झाल्या नाही तर सदस्यत्व रद्द करण्याचा इशाराही त्यात देण्यात आला होता. महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक आरोपानंतर भारतीय कुस्ती महासंघांच्या सदस्यांना निलंबित करण्यात आले होते आणि त्यांच्याजागी अस्थायी समिती स्थापन करण्यात आली होती. महासंघाच्या निवडणुका या ११ जुलै व त्यानंतर १२ ऑगस्ट रोजी प्रस्तावित होत्या. पण, त्यानंतर दोनदा आसाम आणि हरियाणातून निवडणुकांवर स्थगिती आणली गेल्याने निवडणुका लांबल्या आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा