अवैध दारू धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांचे निवेदन

0
28

 

अकोला – अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून तरुण पिढी, विद्यार्थी हे विविध व्यसनांना बळी पडत आहेत. तर यामुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे. खराब ढोरे हे गाव मूर्तिजापूर पासून चार किलोमीटर अंतरावर आहे. या गावात अवैध दारू विक्री होत असल्याने अल्पवयीन मुले, विद्यार्थी व युवा वर्ग व्यसनाधीन होत आहेत. त्यामुळे खरब ढोरे गावातील संतप्त महिलांनी मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले असून लवकरात लवकर संदिप अपार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग व उपविभागीय पोलीस अधिकारी दाभाडे यांना निवेदन देऊन गावात सुरू असलेले अवैध दारू विक्री, मटका यावर कायम स्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी महिलांनी दिला आहे

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा