शेतकरी पुत्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना बॅनरच्या माध्यमातून 6 प्रश्न

0
28

 

बीड- येत्या 27 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्भूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच शेतकरी पुत्र धनंजय गुंदेकर यांनी अजित पवारांसमोर सहा प्रश्न उपस्थित केले आहेत. बारामती प्रमाणे बीड जिल्हा जलसमृद्ध होणार कधी? 2020 चा पीक विमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार कधी? गेल्या वर्षीचे रखडलेले सततचा पाऊस आणि अतिवृष्टी अनुदान मिळणार कधी? जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी एखादे विद्यापीठ होणार कधी? ऊसतोड व बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवणार कधी? आणि बारामतीचे रस्ते चकाचक तसे बीडचे चकाचक होणार कधी? असे सहा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनरच्या माध्यमातून हे सहा प्रश्न विचारले गेले असून सध्या हे बॅनर चर्चेचा विषय आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा