मणिपूर प्रकरणाची सुनावणी गुवाहाटी उच्च न्यायालयात होणार

0
29

दिल्ली : मणिपूर हिंसाचार MANIPUR  प्रकरणांची सुनावणी आता GUWAHATI SC गुवाहाटी उच्च न्यायालयात होणार आहे. या प्रकरणांची CBSC सीबीआय चौकशी करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निर्णय दिला आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या प्रकणात अनेक भाषिक न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत.
मणिपूरमधील हिंसाचारातील एकूण २७ प्रकरणांचा सीबीआय तपास करीत आहे. ही सर्व प्रकरणे आता गुवाहाटी उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले होते. या प्रकरणातील पिडित महिला या त्यांच्या घरुन ऑनलाइन माध्यमाद्वारे त्यांचा जबाब नोंदवतील, अशी विशेष टिप्पणी देखील सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा