सत्यजीत तांबे काँग्रेसमध्ये परतणार?

0
33

पुणे-आमदार सत्यजीत तांबे Satyajit Tambe यांना काँग्रेस वापसीचे वेध लागलेले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे त्यांना पक्षाने निलंबित केले होते. निवडणुकीत ते भाजपच्या BJP  पाठिंब्याने निवडूनही आले होते. आता ते काँग्रेसमध्ये परततील, असे संकेत मिळत आहेत. स्वतः तांबे यांनी पक्षात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना तांबे यांनी हे संकेत दिले आहेत. आपल्याला लक्ष्य करून काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आले, असा आरोप करताना आपल्या रक्तात आजही काँग्रेसच असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माध्यमांशी बोलताना सत्यजित तांबे यांनी आपली नाराजी जाहीर करत आता निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा असल्याचे सांगितले. काँग्रेसमधल्या काही ठराविक लोकांनी टार्गेट करून मला बाहेर काढले आहे. त्यांनी मला काँग्रेसमधून बाहेर ढकलून दिले आहे. पण आमच्या रक्तात आणि विचारात काँग्रेस आहे. ती आता पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की मला त्यांनी परत बोलावले पाहिजे. अद्यापपर्यंत अशी कुठलीही हालचाल झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा