
नागपूर NAGPUR – शरद पवार SHRAD PAWAR यांनी अजितदादा पवार AJIT PAWAR हे आमच्याच पक्षाचे नेते आहेत असे वक्तव्य केल्याने राज्याचे पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आणि अजित पवार यांना विचारले तर बरं होईल, कोण कुठे जातं हे निवडणुकीत स्पष्ट होईल. कारण भाजपने ही खेळी खेळली आहे अशी भूमिका विरोधी पक्षनेते Vijay Vadettiwar विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
वडेट्टीवार म्हणाले, आज राजकारण अस्थिर झाले आहे. कुणाच्या शब्दावर आश्वासनावर विश्वास कोणी ठेवू शकत नाही भाजपने राजकारण नासवले. जनतेचा विश्वासघात केला, त्यांना जनताच जागा दाखवेल, निवडणूक येईल तेव्हा सर्व चित्र स्पष्ट होईल, त्या पक्षाबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही. दुसरीकडे शरद पवार हे मोठे नेते आहेत, कोर्टात केस सुरू होईल म्हणून ही भूमिका त्यांच्या स्ट्रॅटजीचा तो भाग असू शकतो असा सावध पवित्रा घेतला.प्रत्येक पक्ष काम करताना अनेकदा शेवटच्या क्षणी फूट पडते, त्यावर ते आपला प्लॅन बी ठेवतात.

आम्हाला धोका वाटण्याचं कारण नाही. निवडणुकीच्या तारखेपर्यंत जे ठरेल त्यावेळी परिस्थिती दिसेल.
स्वार्थासाठी अनेक लोक बरबटले आहेत, लोकांशी देणं घेणं राहिलं नाही. लोक INDIA च्या पाठीमागे असतील, भाजप सरकारची लोकप्रियता संपली आहे.
शिंदे गट आमदार अपात्रतेबाबत
जो निर्णय घ्यायचा तो अध्यक्ष घेतील, पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊन चॅलेंज करण्याचा अधिकार आहे, मात्र 16 आमदार यात अपात्र होतील.
“इंडिया टुडे” सर्व्हे बाबत विचारले असता आम्ही महाराष्ट्र आणि इंडिया जिंकणार, सर्व्हेत इंडियाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था म्हणून काही उपयोग नाही, इशारा इशारात काम सुरू आहे. दरम्यान,सना खान प्रकरणविषयी बोलताना निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकार आणि केंद्र सरकारने चौकशी केली पाहिजे. नागपुरातील भाजप नेते गप्प आहेत. आमच्या नेत्यांना उघडपणे बोलवलं जाते भाजपच्या लोकांना चुपचाप बोलावलं जाते, यात अनेक नावे सत्ताधारी यांच्याशी जुळलेली आहेत, गरज पडल्यास चौकशीसाठी गृहमंत्री यांना पत्र दिले जाईल असे वडेट्टीवार म्हणाले. सगळ्या एजन्सी त्यांच्या हातात आहेत, त्यामुळे चौकशी कोण करणार? असे रिवेंज पॉलिटिक्स कधी पाहिले नाही. आज तोंड वर करून बोलणाऱ्यांचे नाव लवकरच समोर येईल असा दावा केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून गेले असते, बर झालं असतं असा टोला लगावताना, जपान मधून काही तरी आणतील अशी फार अपेक्षा करणे योग्य नाही असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.