गोंदिया जिल्ह्यात लवकरच पासपोर्ट ऑफिस सुरू होणार – खा प्रफुल्ल पटेल

0
23

 

नागपूर – गोंदिया जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ आहे. मात्र, पासपोर्ट ऑफिसची सुविधा नसल्याची खंत गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना होती. याविषयी बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आज म्हणाले की, भारत सरकारच्या नवीन धोरणामुळे देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता पासपोर्टची सुविधा होणार आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये पासपोर्ट ऑफिस सुरू व्हावे यासाठी संबंधित विभागाला कळविण्यात आले आहे आणि त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे आणि लवकरच जिल्ह्यामध्ये पासपोर्ट ऑफिस सुरू होणार असल्याची माहिती खा प्रफुल्ल पटेल यांनी दिली..

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा